धडक पुढील गाडीशी
समोरच्या गाडीने रस्त्यावर ब्रेक अचानक लावला
जावून भिडता,कारणाविना दोष ही देता तुम्ही त्याला
सुरक्षित ते अंतर नव्हते ,गाडी रोखण्या तुम्हाकडे.
अथवा गतीचे भान नसावे ,विचार येई मनापुढे
मेंदूचा अन् नजरेचाही उचित समन्वय साधावा
डाव्या उजव्या बाजूचा फिरत्या नजरेने वेध घ्यावा
नजर तुमची चित्र रेखते दृष्टीपटावर डोळ्यांच्या
मेंदूलाही खबर देतसे संभावित त्या धोक्याचा
निर्णय आधी ,कृती मग पुढती ,काम असे हे मेंदूला
, सेकंदाचा समय लागतो प्रतिक्रिया म्हणती त्याला
प्रतिक्रियेला उत्तर देण्या ब्रेक लावता जोराने
चाक थांबते ,गाडी घसरते संवेगाचे शक्तीने
दोन सेकंदाचे अंतर ठेवा दोन चालत्या गाड्यात
घड्याळ बघणे शक्य नसे ,हा मंत्र स्मरावा हृदयात
__________________________________
एक हजार एक....एक हजार दोन ....म्हणावयास दोन सेकंद लागतात
__________________________________
हे कसे पडताळून पहावयाचे ते पुढील भागात पाहू ...........
तुमच्या वाहनाची भाषा व अदृश्य शक्तीचा परिणाम
निर्जीव वाहन तुम्हा सांगते भाषा त्याची अलग असे
जाणून घ्या ती,निगा राखता ,कधी न धोका देईल ते.
गुरुत्व मध्य अन् गती नियमांच्या विज्ञानाचे ज्ञान हवे
योग्य रीतीने संचालन मग त्याने सहजची होत असे
संवेग गुणोत्तर ,भारगतीचे सूत्र तुम्ही हे ध्यानी धरा
गती रोखण्या योग्य असे ते बोध तुम्ही हा नित्य स्मरा
शेतकऱ्याची गोफण जेंव्हा गोलगोल ती भिरभिरते
केंद्रोत्सारिक शक्ती त्यातुनी दगडाला मिळते .
या शक्तीचा प्रभाव पडतो वळणमार्गीं वाहनावर
भान हवे हया बाह्य शक्तीचे,वेगाला घाला आवर
अधिक सुरक्षा तुम्हा लाभण्या सीट बेल्ट हा दिला असे
वापर त्याचा तुम्ही करावा ,जीवन रक्षा लाभतसे
विज्ञानाचे ज्ञान लाभले मुठीत मोबाईल आले
वाहन चालविता वापर त्याचा मृत्युस निमंत्रण गेले.
मागून होणारी धडक
मागची धडक जर असेल टाळावयाची
बंधने पुढील कसोशीने पाळावयाची
आरशाचा कोन असावा नीत नीट जुळलेला
दोनतृतीअंश भाग सडकेचा तर एकत्रिती अंश गाडीचा दिसावा
कृती अपुली अन् इशारे स्पष्टपणे दुसऱ्यास दिसावे
उचित समयी,बरेच आधी ,ते दुसऱ्याच्या ध्यानी यावे .
वाहन त्याचे सहजतेने नियंत्रित तो करेल
प्रतिकूल स्थितीत होणारा अपघात त्याने निश्चितच टळेल
दोन सेकंदाचे सुरक्षित अंतर तो जर का नसेल ठेवत
मागील दिव्यानी करा इशारा त्यासी ,ठेवून तो दिवसा ही तेवत.
वाहन पुढे काढण्याची सहज संधी द्या त्याला
निघून जाईल आनंदाने तो,टळेल संकट वेळा
इतकेही करुन जर का तो राहिला फार जवळ
गाडीत पुढच्या अंतर वाढवा ,हाती तुमच्या हेच केवळ
हया बंधन पालनात |व्हाल तुम्ही यशवंत | ठोकर मागील टाळण्यात ||

No comments:
Post a Comment