एकट्या गाडीच्या अपघाताचे रहस्य ( भाग-२)
दूरदूरच्या सफरीवर वाहन जेंव्हा तुम्ही चालविता
विरंगुळा हवा म्हणून संगीत स्वर आवडीने ऐकता
संगीत मनपसंत नसावे ,आवाजाचे भान हवे
नको गुंतणे तालसुरामधे ,सुरक्षितेकडे ध्यान
मादक पदार्थाचे सेवन जेंव्हा कधी करता तुम्ही
गाडी चालवण्याच्या स्थितीत तेंव्हा कधी नसता तुम्ही
मेंदू-हृदय-यकृत यावर परिणाम मद्याचा होई.
मन-शरीर -कृती ह्यांचा मेळ तुटून संचलनी घोळ होई
प्रतिक्रिया-अंतर-अनुमान यांचा अंदाज येत नाही
कृती -गती-ब्रेक यांचा अनुबंध काही केल्या जुळत नाही.
वाहन-दारू असती एक दुज्याच्या रे सवती
एका म्यानी दो तलवारी सांग कशा राहती .
म्हणुनी अंती तुम्हा विनंती:नियम एक निश्चित पाळा
मद्यपान करिता चुकुनी ,वाहन संचलन सदैव टाळा
No comments:
Post a Comment