Tuesday, 23 December 2014

    एकट्या गाडीच्या अपघाताचे रहस्य
     (भाग ----पहिला)
     एकट्या गाडीचा रस्त्यावर जेंव्हा घडतो अपघात
    तुम्हीच चुकीमुळे करुन घेतलेला असतो हा आत्मघात.
गाडी-रस्ता चालक दोष कुणाचा कळत नाही
या गाडी  दुर्घटनेचे कोडे कधीच उलगडत नाही.
   विज्ञानाने स्पष्टपणे दाखवून दिले :दोष इतर कुणाचा नसतो.
  केवळ चालकच अशा दुर्घटनेला जबाबदार असतो
थकवा,भूक,अन् झोप अपुरी ,ताण मनावर कधी नसावा
प्रसन्न चेहरा,हास्य मुखावर चालक तुमचा असा असावा
     क्रोधित मन अन् चिंता सगळ्या निघण्यापूर्वी जा विसरून.
    जिव्हेवरती साखर पेरा ,मनास तुमच्या धरा आवरून
संचलन करता एक प्रहर तर अर्धा घटिका विश्रांती हवी
दोन प्रहार ती झोप रात्रीची ,तुम्हास देई शक्ती नवी
    साठ फुटावरील गाडीचा नंबर जर तुम्ही वाचला सहज
   दृष्टी तुमची निर्दोष ,नाही तुम्हाला चष्म्याची गरज
व्यावसायिक चालका ते विधी बंधन आहे
दर तीन वर्षांनी दृष्टी तपासणीजरुरी आहे .
    (भाग दोन लवकरच )
 

           एकट्या गाडीच्या अपघाताचे रहस्य                                                                ( भाग-२) 
दूरदूरच्या सफरीवर वाहन जेंव्हा तुम्ही चालविता
विरंगुळा हवा म्हणून संगीत स्वर आवडीने ऐकता
    संगीत मनपसंत नसावे ,आवाजाचे भान हवे
  नको गुंतणे तालसुरामधे ,सुरक्षितेकडे ध्यान
मादक पदार्थाचे सेवन जेंव्हा कधी करता तुम्ही
गाडी चालवण्याच्या स्थितीत तेंव्हा कधी नसता तुम्ही
   मेंदू-हृदय-यकृत यावर परिणाम मद्याचा होई.
 मन-शरीर -कृती ह्यांचा मेळ तुटून संचलनी घोळ होई
प्रतिक्रिया-अंतर-अनुमान  यांचा अंदाज येत नाही
कृती -गती-ब्रेक यांचा अनुबंध काही केल्या जुळत नाही.
    वाहन-दारू असती एक दुज्याच्या रे सवती
   एका म्यानी दो तलवारी सांग कशा राहती .
म्हणुनी अंती तुम्हा विनंती:नियम एक निश्चित पाळा  
मद्यपान करिता चुकुनी ,वाहन संचलन सदैव टाळा            
            वाहन पुढे काढणे किंवा दुसऱ्यास पुढे काढू देणे
        जेंव्हा जेंव्हा वाहन पुढे काढण्याची तुम्हाला इच्छा होईल
        मनाला तुम्ही प्रश्न विचारा :ह्याने .किती फायदा होईल
    घाटामध्ये,वळणावरती, पुलावर, क्रॉसिंगवरती,मनाईसंकेत दिसता
    गाडी पुढे काढण्याच्या मोहापायी चक्रव्यूहात  तम्ही फसता
     वाहन पुढे काढण्या नसे कायद्याने कूठे मनाई
    सावध -अंदाज  जरूर असावा,परि नको उगीच घाई
     जरा दुरवर राहता तुम्ही,दृष्टी क्षेत्रही वाढतसे
   स्थिती समोरून येत्या वाहनाची तूम्हास ती स्पष्ट दिसे
       निश्चित निर्णय घेऊन तुम्ही ,मान वळवूनी मागे पहा.
     तुम्हास लंघून जाण्यासाठी तयार नाही न कुणी दुजा
  तयार असला, जर कुणी, अग्रक्रम द्या तुम्ही  त्याला.
नसता कुणी ,सिग्नल देऊनी गती वाढवूनी पुढे चला
    वाहन पुढे काढण्याची इच्छा अनिवार,फार धोक्याची
   तीन वाहनाची गती ध्यानी तुम्ही नीत् घ्यावयाची
 चूक जराशी होता कठीण स्थिती निर्माण होईल
अशा तुमच्या वागण्याने जीव अन्य धोक्यात येईल
  पूर्ण विचाराअंती आता अनुमान  तुम्हा करणे आहे
  कारण जीवन अनमोल ईश्वरी देणे आहे .    
  

 

   
  
  
 
   चौरस्त्यावारचा    चक्रव्युह  
 ----------------
कृती प्रमाणे स्थिती असावी चौरस्त्यावर वाहनाची .
योग्य इशारे, रहदारीचे भान ठेवूनी गती नियंत्रित ठेवावी
    लहान रस्त्यावरुनी मोठ्या सडकेवर येवून जेंव्हा मिळता
   "थांबा-पहा -चला "हा संकेत तुम्ही कधी पाळता
उजवीकडील वाहना रस्ता आधी द्यावा
विधीबंधनकारक  संकेता  तुम्ही मान द्यावा
   अनियंत्रित चौरस्त्यावर एक दुज्याला समजून घ्या
  देह बोलीने,शांत मनाने,दुसऱ्या पहिले जाऊ द्या
  "थांबा-पहा-चला "संकेत सांगतो लुकलुकणारा लाल दिवा
"अग्रक्रम तो दुज्यास द्यावा"हेच सांगतो लुकलुकणारा पीत दिवा.
  लाल दिवा हा धोकादर्शक :वाहन तुमचे रोखावे
  हिरव्याची अनुमती मिळताक्षणी सावधतेने पुढे जावे
हिरवा जेंव्हा पिवळा होतो अक्सिलेटर  अधिकच दबतो
क्षण हाचि खरा धोक्याचा ,असतो चालकाने टाळावयाचा
    पिवळ्या दिव्याचा इशारा पाहून जर वाहन मध्ये थांबणार असेल
   गती वाढवून निघून जाणे,हीच कृती मग उचित ठरेल .
चौरस्त्यावर येण्याआधी ब्रेकवर पाय ठेवला तर
प्रतिक्रियेचा वेळ वाचतो,ब्रेक लावणे जरूर वाटले तर. 

 धडक पुढील गाडीशी
     समोरच्या गाडीने रस्त्यावर ब्रेक अचानक लावला
     जावून भिडता,कारणाविना दोष ही देता तुम्ही त्याला
सुरक्षित ते अंतर नव्हते ,गाडी रोखण्या  तुम्हाकडे.
अथवा गतीचे भान नसावे ,विचार येई मनापुढे
   मेंदूचा अन् नजरेचाही उचित समन्वय साधावा  
  डाव्या उजव्या बाजूचा फिरत्या नजरेने वेध घ्यावा
नजर तुमची चित्र रेखते दृष्टीपटावर डोळ्यांच्या
मेंदूलाही खबर देतसे संभावित त्या धोक्याचा
   निर्णय आधी ,कृती मग पुढती ,काम असे हे मेंदूला
,   सेकंदाचा समय लागतो प्रतिक्रिया   म्हणती त्याला
प्रतिक्रियेला उत्तर देण्या ब्रेक लावता  जोराने
चाक थांबते ,गाडी घसरते संवेगाचे शक्तीने
    दोन सेकंदाचे अंतर ठेवा दोन चालत्या गाड्यात
   घड्याळ बघणे शक्य नसे ,हा मंत्र स्मरावा हृदयात
__________________________________
   एक हजार एक....एक हजार दोन ....म्हणावयास दोन सेकंद लागतात
__________________________________
 हे कसे पडताळून    पहावयाचे ते पुढील भागात पाहू ...........
                तुमच्या वाहनाची भाषा व अदृश्य शक्तीचा परिणाम
   निर्जीव वाहन तुम्हा सांगते भाषा त्याची अलग असे
  जाणून घ्या ती,निगा राखता ,कधी न धोका देईल ते.
   गुरुत्व मध्य अन् गती नियमांच्या विज्ञानाचे ज्ञान हवे
   योग्य रीतीने संचालन मग त्याने  सहजची होत असे
  संवेग गुणोत्तर ,भारगतीचे सूत्र तुम्ही हे ध्यानी धरा
 गती रोखण्या योग्य असे ते बोध तुम्ही हा नित्य स्मरा
  शेतकऱ्याची गोफण जेंव्हा गोलगोल ती भिरभिरते
  केंद्रोत्सारिक शक्ती त्यातुनी दगडाला मिळते .
  या शक्तीचा प्रभाव पडतो वळणमार्गीं वाहनावर
   भान हवे हया बाह्य शक्तीचे,वेगाला घाला आवर
  अधिक सुरक्षा तुम्हा लाभण्या सीट बेल्ट हा दिला असे
 वापर त्याचा तुम्ही करावा ,जीवन रक्षा लाभतसे
  विज्ञानाचे ज्ञान लाभले मुठीत मोबाईल आले
 वाहन चालविता वापर त्याचा मृत्युस निमंत्रण गेले.
           मागून  होणारी   धडक
    मागची धडक जर असेल टाळावयाची
   बंधने पुढील कसोशीने  पाळावयाची
आरशाचा कोन असावा नीत नीट जुळलेला
दोनतृतीअंश भाग सडकेचा तर एकत्रिती अंश गाडीचा दिसावा
   कृती अपुली अन् इशारे स्पष्टपणे  दुसऱ्यास दिसावे
   उचित समयी,बरेच आधी ,ते दुसऱ्याच्या ध्यानी यावे .
वाहन त्याचे सहजतेने नियंत्रित तो करेल
प्रतिकूल स्थितीत होणारा अपघात त्याने निश्चितच टळेल
    दोन सेकंदाचे सुरक्षित अंतर तो जर का नसेल ठेवत
   मागील दिव्यानी करा इशारा त्यासी ,ठेवून तो दिवसा ही तेवत.
वाहन पुढे काढण्याची सहज संधी द्या त्याला
निघून जाईल आनंदाने तो,टळेल संकट वेळा
    इतकेही करुन जर का तो राहिला फार जवळ
   गाडीत पुढच्या अंतर वाढवा ,हाती तुमच्या हेच केवळ
हया बंधन पालनात |व्हाल तुम्ही यशवंत | ठोकर मागील टाळण्यात ||
   
                                                                                                                               

Monday, 22 December 2014

         सामोरासमोरची  धडक
      दोन गाड्यांच्या अपघातांत धडक समोरची फारच भीषण
     कारण दोन गाड्यांच्या वेगाचे होई तिथेंमिश्रण
प्रत्येकाने आपापली मार्गिका पाळावी
समोरची धडक सध्या उपायाने टाळावी
    पण असे होतनाही दुसऱ्याच्या मार्गीकेतील प्रवेश काळत नाही
   कारणे असतात अनेक:मानव,पशु.कधी येतात कळत नाही
न कळत दुसऱ्या लेन मध्ये जातो,अपघाताला निमंत्रण देतो.
असेल हे टाळावयाचे तर पुर्वानुमानाने स्वताला सांभाळावयाचे
   दुसरा तुमच्या वाटेत आला ,हॉर्न, लाईट बोंब मारून सावध करा त्याला
  गती गाडीची कमीत कमी करुन ,डाव्या बाजूला घेऊन धडक समोरची टाळा
रस्ता सोडून गाडी घसरली तरी चालेल, त्यामुळे जिवावरचे संकट तरी टळेल
  गाडी जेंव्हा वळण घेते अदृश्य शक्ती गाडीचा ताबा घेते
 केंद्रोत्सारीत शक्ती डोळ्यांना दिसत नाही
गाडीच्या संचालनावर परिणाम करणे सोडत नाही. 
  डाव्यावळणावर आपली मार्गिका जेंव्हा  तुम्ही पार करता
समोरून येणाया गाडीच्या  मार्गात प्रवेश करता
   अशा वेळी ब्रेकचा वापर योग्य रीतीने करावयास हवा
  अलग गतीने फिरणारया चाकांचा समतोल साधायला हवा
मध्य रेषेशी जवळीक साधून उजवे वळण पूर्ण करा
केंद्रोत्सारिक शक्तीने घसरणारया गाडीला असे आवरून धरा.