सकाळी जाग आली तेंव्हा सकाळचे ७ वाजले होते ,आज पुढचा प्रवास करावा की नाही ह्या विचारात होतो. प्रथम न्याहारी करू, मग बघू असा विचार केला आणि पोटभर नास्ता केला. चहा पोटात जाताच तरतरी आली .सौ.सुनीताला म्हणालो "इथे प.पु. गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे .ते असतील तर त्यांचे आशीर्वाद घेवू ".आश्रमातील शांत प्रसन्न वातावरण, बाजूला खळाळणारा पाण्याचा प्रवाह, मन उल्हसित करून गेला. ह्या महाराजांची भेट होईल ह्याची खात्री नसते. योग जुळून आला होता. महाराजांचे दर्शन घेतले आशिर्वाद मिळाला. हॉटेलवर परत आलो. दिवसाच्या उजेडात हॉटेल ची भिकार अवस्था पाहून ह्यापेक्षा लोणावळा येथे जावून विश्रांती घ्यावी असे ठरले. कारण अंतर फार कमी म्हणजे फक्त १५किमि होते. लोणावळ्यात हॉटेल पण चांगली होती ना? आता फक्त ११ वाजले होते तेंव्हा निघावे हेच बरे. टाटा कॉलोनी पासून डांबरी सडक सोडून आड मार्ग घेतला .प्रखर ऊन,उभा चढ पण जंगलची सावली ह्यामुळे लवकरच लोणावळा येथे पोहचलो .चांगल्या हॉटेल मध्ये विश्राम, स्नान,कपडे धुणे ,बूट मोजे ह्याची दुरुस्ती करून ८ वाजता जेवून घेवून झोपी गेलो.
२०-२-९५ सोमवार
सकाळी ५ वा जाग आली सर्व कामे आटोपून बाहेर पडलो. आता सडक सरळ सपाट होती. मध्ये भोजनाचा आस्वाद ,विश्रांती घेवून तळेगाव येथे ४ वा पोहचलो .इगल फ्लास्क कंपनीच्या शोरूम मधून दिसणारे तळेगावदाभाडेचे दृश्य फारच रमणीय वाटले .सेवानिवृतीनंतर असेच एखादे ठिकाण वास्तव्यासाठी निवडायला हवे! वाटेत जागाखरेदीसाठी.निघालात का ? अशी विचारणा झाली ? कारण हा भाग विकसित होत होता .३४ कि मी अंतर आज पूर्ण झालं होतं! हॉटेल मध्ये आराम केला पुण्यास फोन करून शिरीष व सौ सुगंधाला उद्या येत असल्याचे कळविले .
२१/२/९५
सकाळी नेहमीप्रमाणे ५ वाजता जाग आली .तयार होऊन पुण्याच्या मार्गाला लागलो. आज भाच्याकडे मुक्काम होणार होता.बाणेर मार्गे औंधला पोहोचलो. आमचे उन्हाने रापलेले चेहेरे व पायाची अवस्था पाहून सुगंधाला तर रडूच आले. ओळखीच्या डॉक्टर कडून पायावर उपचार केले व काही अॅन्टीबायोटीकस् घेतली. घरी फोन करून खुशाली कळविली. आता २/४ दिवस मुक्काम करून निघा असा आग्रह झाला ,पण "सौ.सुनीताची सुट्टी अपुरी पडेल, तेंव्हा सकाळी पुढे निघणार" हा दृढनिश्चय बोलून दाखवला. शिरीष म्हणाला, मामा तू निघ आता .उरलेली सगळी ठिकाणं स्कूटरच्या टप्प्यात आहेत. काही त्रास झाला तर कळव ! मी अन् सुगंधा स्कूटरवर येऊ तुम्हाला घ्यायला. मामा "तुझ्याकरिता उरळीकांचन येथे फार्मर र्इन ह्या हॉटेलमधे जागा राखून ठेवली आहे". त्याची मदत लागल्यास अवश्य कळविण्याचे आश्वासन त्याला दिले .सौ सुनितानेही आता पायात पी .टी.शूज वापरण्याचे ठरविले रात्री लवकर झोपी गेलो.
२२ -२-९५ मंगळवार
सकाळी ५-३० वाजता घराबाहेर पडलो पुण्याच्या शिवेपर्यंत शिरीष व सुगंधा आले होते. हडपसर ते लोणी काळभोर प्रवास एका झटक्यात केला. न्याहारी करत असताना थेऊर कडे जाणारा बैलगाडी
रस्ता माहित करून घेतला. त्या वाटेने दोन्ही बाजूस ऊसाची शेती होती. मधूनच येणारे पाण्याचे पाट व चिखल
इकडेतिकडे उडयामारीत पार करावे लागत होते. ५-६ कि मी अंतर वाचणार होते.
सकाळी १०-३० चे सुमारास थेऊर येथे पोहचलो. वाटेत गावकरी मंडळी भेटली. चहापान झाले, मग भोजना नंतर जा असा आग्रह झाला. आता आधी दर्शन अन मग भोजन असे सांगताच मंडळीनी परवानगी दिली. सर्व लहानथोर मंडळी पाया पडली गावकरी मंडळीच्या ह्या प्रेमाने आम्हास देखील गहिवरून आले.
सकाळी १०-३० चे सुमारास थेऊर येथे पोहचलो. वाटेत गावकरी मंडळी भेटली. चहापान झाले, मग भोजना नंतर जा असा आग्रह झाला. आता आधी दर्शन अन मग भोजन असे सांगताच मंडळीनी परवानगी दिली. सर्व लहानथोर मंडळी पाया पडली गावकरी मंडळीच्या ह्या प्रेमाने आम्हास देखील गहिवरून आले.
मंदिरात एक विश्वस्त श्री पेंडसे ह्यांची भेट झाली. श्री चिंतामणी चे दर्शन घेतले महाप्रसादाचे जेवण झाले. अवचित मेहूण म्हणून दक्षिणा कडोसरीस लावली. सौ सुनीताची खणा नारळाने ओटी भरली. नंतर त्यांनी प्रयाग धाम मार्गे उरळीकांचन कडे जाणारा जवळचा मार्ग दाखविला पुन्हा श्रीचे दर्शन घेवून थॆऊरचा निरोप घेतला.सभोवार शेती होती; हिरवळ होती पण छाया देणारे झाड नव्हते. उन्हाचा कडाका जाणवत होता. जेमतेम एक तास झाला असेल, सुनीताचा पित्तप्रकोप उसळून आला एक दोन उलट्या झाल्या अन उरलेल अंतर कसे पार पडणार ह्याची काळजी वाटू लागली. संपूर्ण प्रवासात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की सकाळी उल्हास वाटायचा ,दुपारी उन्हाचा त्रास उमेद घालवायचा अन संध्याकाळी मनावर नैराश्याची छाया पसरू लागायची ! आज तर भर दुपारीच अवसान गळालं ह्या पित्त प्रकोपाने ! हळूहळू प्रयागधाम ला पोहचलो .मुक्तिधाम (नाशिक) सदृश या मंदिरास भेट दिली नाही.
पुढील भाग मोरगाव इथे वाचू शकाल
पुढील भाग मोरगाव इथे वाचू शकाल
No comments:
Post a Comment